जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

माझ्या शहराला चांगली रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणी, स्वच्छता, दवाखाने, चांगल्या शिक्षण संस्था, उद्योगांची गरज आहे.

औरंगाबाद : माझ्या शहराला चांगली रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणी, स्वच्छता, दवाखाने, चांगल्या शिक्षण संस्था, उद्योगांची गरज आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तुम्ही हे सर्व देण्यास जनतेशी बांधील आहात, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांना विचारला आहे. जलील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ट्विट करुन हा प्रश्न उपस्थित केला आहे. 

शिवसेना म्हणते, संभाजीनगर आणि कॉंग्रेस म्हणते औरंगाबाद; भाजपच्या राजू शिंदेंचा टोला

खासदार जलील पुढे म्हणतात, की तुमची औरंगाबाद महानगरपालिकेतील गेल्या ३० वर्षांमध्ये केलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभार लपवण्याची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही शहराच्या नामांतराचा जुना मुद्दा पुढे केला जात आहे. जनतेला कमी समजू नका. त्यांना सर्व काही माहीत आहे.

पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

माझे शहर उद्धवस्त करु नका
आता विमानतळाच्या नामांतराची मागणी भाजपने केली आहे. पक्षाचे खासदार भागवत कराड यांनी ता.पाच जानेवारी रोजी दिल्लीत नागरी उड्डायन तथा शहरनियोजन मंत्री हरिदीपसिंग पुरी यांची भेट घेतली होती.  याला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला. माझे सुंदर शहर उद्धवस्त करु नका अशी त्यांनी मागणी केली. खासदार इम्तियाज जलील यांची मागणी भाजपच्या नवीन खासदारांकडून औरंगाबादच्या लोकांच्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली होती.

&nb

sp;

शहराला सक्षम वाहतूक जोडणी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, विमानतळाचे विस्तारीकरणाची गरज आहे. हे मुद्दे उपस्थित करणे चांगली बाब नाही की त्याऐवजी बिनमहत्त्वाचे विषय पुढे करणे? या प्रकारच्या घाणरेड्या राजकारणामुळे माझे सुंदर शहर उद्धवस्त होईल, असे  खासदार इम्तियाज जलील प्रश्न विचारला. याबाबत त्यांनी ट्विट केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM Leader Imtiaz Jaleel Criticized Uddhav Thackeray On Renaming Of Aurangabad Political News