छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ (जेएमएफसी)ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. यात बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णी राज्यात पहिली आली. .कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२ ची परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर पडली होती. कोरोनानंतर ९ सप्टेंबर २०२३ ला परीक्षा झाली. २४ ऑगस्ट २०२४ ला मुख्य परीक्षा झाली. त्यातील ३४३ उमेदवारांची मुलाखतींसाठी निवड झाली होती..ता. १७ ते २९ मार्च या काळात मुलाखती पार पडल्या. शनिवारी (ता. २९) अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात ११४ जणांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठी तात्पुरती निवड झाल्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. अंतिम निवडयादी लवकरच एमपीएससी जाहीर करणार आहे..पहिल्या दहामध्ये नऊ मुलीया निकालात पहिल्या दहा टॉपर्समध्ये नऊ मुलींचा समावेश आहे. बीडची ऋचा विठ्ठल कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविले. ऋचा कुलकर्णी राज्यात पहिली आली आहे. सायली संपत झांबरे द्वितीय, किरण संभाजी मुळीक ही तिसरी आली. शिवाणी रामनाथ फाडोळ, तन्वी रहेमान शेख, सोनिया अविनाश गंधले, तनुज रमेश कुसारे, सुवर्णा विनायक शास्त्री, वंदना अरविंद चामले, किरण शांताप्रसाद वर्मा, विपुल एकनाथराव गुंजाळ, अनिकेत लिंबाराव कोकरे आदींचा पहिल्या नऊमध्ये समावेश आहे..Latur Crime : लातूर तालुक्यातील करकट्टा येथे युवकाची हत्या .पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. त्यामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. एलएलबीचे शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवले. अॅड. गणेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन, आई-वडील व आजी यांच्या प्रोत्साहनामुळे हे यश मिळाले.- ऋचा कुलकर्णी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.