गेवराई - बीडच्या शहरातील विविध सुसज्ज कॉलनींमधील ओपन स्पेस अर्थात मोकळी जागा, उद्याने आणि काही ठिकाणी तर धार्मिक स्थळांच्या परिसरात प्रेमीयुगुलांनी अड्डा मांडल्याचे चित्र दिवसेंदिवस गेवराई शहरात ठळकपणे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा वावर वाढल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कुटुंबवत्सल लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.