Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले असून उपोषणाचा चौथा दिवस आहे.
Road Blockade in Pimpalgaon Dola Over Maratha Reservation

Road Blockade in Pimpalgaon Dola Over Maratha Reservation

sakal

Updated on

कळंब - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले असून उपोषणाचा चौथा दिवस आहे. अद्यापही शासनस्तरावर हालचाली दिसून येत नाही.या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कळंब -ढोकी मार्गावर पिंपाळगावं डोळा येथे मराठा समाजाच्या वतीने मंगळवार (ता. एक) दोन तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.तहसीलदार हेमंत ढोकले यांनी आंदोलकाच्या भावना शासनापर्यंत पोहचविन्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकानी आंदोलन माघे घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com