

Two Decades of Consistent Ridge Gourd Cultivation
Sakal
अर्धापूर : शेती फायदेशीर राहिली नाही, उत्पादनं खर्च वाढला आहे,भाव मिळत नाही, निसर्ग साथ देत नाही अशी चर्चा आपण नेहमी ऐकतो, ही चर्चा बऱ्याच अंशी खरी असली तरी याला अपवाद ठरणारे बरेच शेतकरी आहेत की ज्यानी शेतीच्या माध्यमातून आपला सार्वांगिन विकास साधला आहे.आशा शेतकऱ्यात रोडगी (ता अर्धापूर जिल्हा नांदेड) येथील शेतकरी प्रकाशराव सितापराव यांंचा समावेश होतो,ते गेल्या दोन दशकांपासून दोडक्याची यशस्वी लागवड करित आहेत.या दोडक्याने त्यांना आर्थिक स्थैर्य दिले असून त्यानी सर्वांगीण विकास साधला आहे.मुलांचे शिक्षण,घर बांधकाम ,शेती व भूखंड खरेदी हे सर्व शेतीच्या माध्यमातून शक्य झाले आहे.यंदाच्या हंगामात त्यांना खर्च वजा करून दोडक्याच्या लागवडीतुन सुमारे पाच लाखांचे उत्पन्न झाले आहे.