ग्रामीण भागातील रस्त्यावर जागोजागी कुपाट्या 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 March 2020

बीड जिल्ह्यातील आवरगाव, देवठाणासह काही गावांनी रस्ते बंद केले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील दुधियापुरा, वडगावकर गल्ली, मठगल्ली, संभाजीनगर (झोपडपट्टी) भागातील जागरूक नागरिकांनी रविवारी (ता. २९) लॉकडाऊन केल्याचे चित्र निर्माण झाले. 

किल्लेधारूर (जि. बीड) - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. संपर्क टाळला जावा या हेतूने प्रशासनाने संपूर्ण देश लॉकडाऊन केला आहे. कोरोना आपल्या गावात पसरू नये, यासाठी तालुक्यातील आवरगाव, देवठाणासह काही गावांनी रस्ते बंद केले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील दुधियापुरा, वडगावकर गल्ली, मठगल्ली, संभाजीनगर (झोपडपट्टी) भागातील जागरूक नागरिकांनी रविवारी (ता. २९) लॉकडाऊन केल्याचे चित्र निर्माण झाले. 

ग्रामीण भागातील नागरिकांना विदेशासह पुण्या-मुंबईसह परराज्यांतून आलेल्या नागरिकांची भीती वाटते. यासाठी त्यांनी तपासणी करूनच गावात प्रवेश करावा, अशी त्यांची मागणी असते. त्याचप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीचा संपर्क होऊन महामारी पसरू नये, या हेतूने शहरातील काही सुजाण नागरिक आपली राहती वस्ती, गल्ली लॉक करत आहेत.

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

आतील लोकांनी बाहेर जायचे नाही, बाहेरील व्यक्तीला आत घ्यायचे नाही, असे नागरिकांनी ठरवले आहे. संभाजीनगर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भांगे, कैलास बोरगावकर, राजेश सोनवणे, बालाजी गायकवाड, महादेव गायकवाड, बापू वराडे यांनी वस्ती, गल्ली रस्त्यावर कुपाट्या टाकून प्रवेश बंद केला आहे. यासंदर्भात नागनाथ सोनटक्के म्हणाले, आमच्या भागात येणाऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून राहावे. परगावाहून येणाऱ्यांनी तपासणी करून यावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roads closed in rural areas