

Wildlife Census 2026: Mahur Forest Range Records 515 Wild Animals on Buddha Purnima
Sakal
माहूर : माहूर वनपरिक्षेत्रात पानस्थळा वरील निसर्गानुभव कार्यक्रम-2026 अंतर्गत प्राण्यांची नुकतीच प्रगनना करण्यात आली. प्रगणनेत अस्वल, बिबट, रानडुक्कर, नीलगाय,ससा,मोर यांसह विविध 515 वन्यप्राणी आढळून आले. यासाठी पान स्थळावर आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते अशी माहिती माहूर वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.