रोहिच्या धडकेत, ॲटोची पलटी, प्रवाशी ठार 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

0- जंगलातून जाणारा रस्ता असल्याने वळणावर काही दिसत नाही
0- जंगील प्राण्याची नेहमी रस्त्यावर ये- जा
0- ताराची जाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावावी
0- सुसाट वेगातील वाहनावर प्रतिबंध घालावा
 

नांदेड : प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ॲटोला रस्त्यात रोही या जंगली प्राण्याने धडक दिली. या धडकेत ॲटोची पलटी होऊन ॲटोतील एक प्रवाशी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (ता. चार) दुपारी दोनच्या सुमारास लिंगी फाटा ते सिंगोडा फाटा (ता. किनवट) रस्त्यावर घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून लिंगी फाटा (ता. किनवट) येथून सिंगोडा फाटा जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन ॲटोचालक गजानन दत्ता पल्लाडे (वय २१) हा बुधवारी दुपारी जात होता. सुसाट वेगाने जाणाऱ्या या ॲटोसमोर रस्ता ओलांडणारा जंगली रोही आला. त्याला ॲटोची धडक बसली. यात ताकदवान रोही पुढे पळाला मात्र ॲटोची धडक बसताच चालकाचा ॲटोवरील ताबा सुटला. अचानक झालेल्या या धडकेमुळे ॲटो रस्त्याच्या कडेला पलटला. यात गजानन खुशालसिंग कठारे (वय ५०) रा. लिंगी (ता. किनवट) यांना जबर दुखापत झाली. डोक्याला जबर मार लगाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

ॲटचालकाने आपल्या ताब्यातील ॲटो हयगयी व निष्काळजीपणे चालवून ॲटो पलटी केला व त्याच्या निष्काळाजीपणामुळे गजानन कठारे यांचा मृत्यू झाला. अशी तक्रार अरुणा सुभाष मादावर यांच्या फिर्यादीवरुन मांडवी पोलिस ठाण्यात ॲटोचालक गजानन पल्लाडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. केंद्रे करीत आहेत. 

या रस्त्यावर नेहमी अपघाताची मालिका

लिंगी फाटा ते सिंगोडा फाटा या रस्त्यादरम्यान अनेक ठिकाणी वळणे आहे. तसेच हा रस्ता घनदाट जंगलातून जातो. त्यामुळे रस्त्यावर वाहनाशिवाय अन्य काही दिसत नाही. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगात आपली वाहन चालवितात. तशातच रस्ता ओलांडणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. अनेक वेळा अचानक जंगील प्राणी समोर दिसताच त्यांना वाचविण्याच्या नादात वाहनचालक गोंधळुन जातात व अपघात घडतो. अस्वल, रोही, रानरेडा, गवा, साप, माकड यासह आदी प्राणी रस्त्यावर अचानक आल्याने वाहनचालकांचा वाहनांवरील ताबा सुटतो व अपघात होतो. असाच हा अपघात झाल्याचे दिसून येते.

वन विभागाचे दुर्लक्ष

जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेने ताराची जाळी लावली तर जंगली प्राणी 
रस्त्यावर येणार नाहीत. तसेच वाहनचालकाचे लक्ष विचलीत होणार नाहीत त्यामुळे अशा जंगल गातून जाणाऱअया रस्त्यावर सुरक्षितता म्हणून दोन्ही बाजूने जाळी लावावी किंवा रस्त्याच्या कडेने वाहने हळु चालवावी अशा सुचना फलकाद्वारे दिल्या तर अपघात नक्कीच कमी होतील.
सरपंच अरविंद पवार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At Rohit's beating, Atoe's turn, kills the passenger