आरटीई प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत,एकशे बावन्न विद्यार्थ्यांची निवड

0No_20date_20of_20admission_20given_20yet_20Confusion_20among_20parents_20about_20RTE_20admission.jpg
0No_20date_20of_20admission_20given_20yet_20Confusion_20among_20parents_20about_20RTE_20admission.jpg

उमरगा (जि.उस्मानाबाद) : वर्ष २०२०-२१ आरटीईच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतीत प्रवेश घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. लॉकडाउनमुळे प्रवेश प्रक्रियेत व्यत्यय आल्याने बहुतांश प्रवेश होऊ शकले नाहीत. उमरगा तालुक्यातील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या २३ विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठीच्या १६६ प्रवेशासाठी लॉटरी पद्धत झाली. त्यात १५२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली, तर १४ प्रवेशासाठी १२६ विद्यार्थ्याची प्रतिक्षा आहे.

लॉटरी काढून पाच महिने झाले मात्र लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद असल्याने रितसर प्रवेश घेण्यासाठी अडचणी आल्या. तालुक्यातील सरस्वती इंग्लिश स्कूल आलूर, सोमेश्वर इंग्लिश स्कूल आलूर, छत्रपती शिवाजी इंग्लिश स्कूल बलसूर, समृध्दी इंग्लिश स्कूल (चिंचोली भुयार), शायनिंग स्टार इंग्लिश स्कूल (दाळिंब), संजीवनी मॉडर्न इंग्लिश स्कूल (एकोंडी जहागीर), फिनिक्स इंग्लिश स्कूल (गुंजोटी), सेवाग्राम इंग्लिश स्कूल (कवठा), इंदिरा इंग्लिश स्कूल (कुन्हाळी), प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल (तुरोरी), रायझिंग सन इंग्लिश स्कूल, डॉ.एचबीके इंग्लिश स्कूल श्री.श्री. रविशंकर मराठी प्राथमिक शाळा, शरणप्पा मलंग मराठी शाळा, डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल, बालविकास मराठी प्राथमिक, माऊली इंटरनॅशनल स्कूल, श्री श्री रविशंकर इंग्लिश स्कूल, ओरियन इंग्लिश स्कूल, डॉ.कुशाबा धोंडिबा शेंडगे सीबीएसई स्कूल, हरिलाल इंग्लिश स्कूल, लोटस पोद्दार इंग्लिश स्कूल (उमरगा) व हायटेक इंग्लिश स्कूल, येणेगुर या शाळेत इयत्ता पहिली वर्गासाठी १५२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : 'मारुतीच्या' रूपाने देशमुखांची औसा मतदारसंघात मजबूत तटबंदी, उटगेंना...

३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशाची मुदत
ज्या विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत लॉटरी लागली आहे. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावायाचा आहे. त्यांनतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत केवळ ४१ विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी कागदपत्रे जमा झाल्याने ते पडताळणी समितीकडे प्राप्त झालेली आहेत. निवड झालेल्या उर्वरीत प्रवेशासाठी पालकांनी संबंधित शाळेकडे संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी केले आहे.

(संपादन : गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com