esakal | परभणीत पहिल्याच दिवशी दीडशे शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

PRB

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील शाळांमधील शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्याची जबाबदारी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनावर सोपवली आहे. त्यानुसार परभणी महापालिकेने नऊ सेंटर्सवर  बुधवारी (ता.१८) शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या. 

परभणीत पहिल्याच दिवशी दीडशे शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट 

sakal_logo
By
सकाळ वृतसेवा

परभणी ः शासनाने (ता.२३) नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या करण्याचे आदेश दिल्यानंतर शिक्षकांना आरटीपीसीआर टेस्ट देखील अनिवार्य केल्या. त्यामुळे महापालिकेच्या विविध केंद्रावर शिक्षकांची गर्दी वाढू लागली आहे. बुधवारी (ता.१८) १५० शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यासाठी नऊ सेंटर्सवर महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली.  

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातील शाळांमधील शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्याची जबाबदारी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनावर सोपवली आहे. त्यानुसार (ता.१७ ते २२) नोव्हेंबर या कालावधीत शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसाठी पालिकेच्या शहरातील नऊ सेंटर्सवर सकाळी दहापासून ते सायंकाळी पाचपर्यंत ही टेस्ट केली जाणार आहे. 

हेही वाचा - परभणी : घरगुती वादातून पत्नीने केला पतीचा दगडाने ठेचुन खून

सर्व शाळांतील शिक्षकांनी तपासणी करून घ्यावी
महापालिकेचे सीटीक्लब जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजूस, प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर, आरोग्य केंद्र शंकर नगर, आरोग्य केंद्र खंडोबा बाजार, आरोग्य केंद्र इनायत नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र दर्गारोड, प्राथमिक आरोग्य केंद्र वर्मानगर, प्राथमिक आरोग्य केंद्र साखला प्लॉट, प्राथमिक आरोग्य केंद्र जायकवाडी रुग्णालय या नऊ ठिकाणी आरटीपीसीआरची तपासणी चालू केली आहे. बुधवारी (ता.१८) १५० शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. शहरातील सर्व शाळांतील शिक्षकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त देविदास पवार, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी केले आहे.  

हेही वाचा - हिंगोली : २२ लाखचे गांजाची झाडे जप्त- एसपी कलासागर यांची धाडशी कारवाई

स्वच्छता निरीक्षकांना आयुक्तांचा 
दंडात्मक कारवाईचा इशारा 

परभणी ः महापालिकेच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागअंतर्गत सर्व कचरा ता.२४ नोव्हेंबरपर्यंत उचलून घ्यावा, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी दिला आहे. महापालिकेत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आयुक्त श्री.पवार यांनी सहायक आयुक्त, शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक व अभियंता यांची बैठक घेतली. 

कचऱ्याचा ढीग दिसल्यास दंड 
शहरातील ६३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता करून घ्यावी, ते नादुरुस्त असतील तर दुरुस्त करून घ्यावीत, पाण्याची व्यवस्था करावी, पाण्याची मोटार बंद असेल तर ती दुरुस्त करून घ्यावी, रॅम्प बसविण्यात यावेत, महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण ओडीएफ प्लसप्लस थ्री स्टारमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत. सार्वजनिक स्वच्छताग्रहाच्या ठिकाणी फीडबॅक मशीन बसविण्यात यावी, अशा सूचना केल्या. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा पडलेला असेल तर तत्काळ तो उचलून घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचे मटेरिअल पडलेले असेल तर संबंधितास नोटीस देऊन दंड आकारावा, स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागामध्ये परिसर स्वच्छ ठेवावा, स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, परिसरात कुठेही कचरा आढळल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात इशारा देऊन त्यांनी स्वच्छता निरीक्षकांनी येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत प्रभागातील सर्व कचरा उचलून घ्यावा व कचरामुक्त कुंडी करावे, असेही म्हटले. आपण शहरात सर्व ठिकाणी फेरफटका मारणार आहे. ज्या प्रभागात सार्वजनिक स्वच्छालय अस्वच्छ दिसतील वा कचऱ्याचा ढीग दिसेल तेथील स्वच्छता निरीक्षकास आपण दंड लावूत, असेही यावेळी त्यांनी उपस्थितांना बजावले. 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top