land scam
sakal
बीड - वीस वर्षांच्या अधिकृत भाडेपट्ट्यावर (रेंट ॲग्रीमेंट) दिलेल्या जमिनीवरील कायदेशीर ताबा व नोंदी परस्पर हटवून, त्याच जागेवर चक्क स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तब्बल ७ कोटी रुपयांचे भलामोठा कर्ज लाटल्याचा खळबळजनक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. या भयंकर फसवणूक प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक, आनंदवाडीचे सरपंच, ग्रामसेवक आणि जागामालकासह एकूण सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.