
घनसावंगी जि. जालना - तक्रारदार यांच्या आई व गावातील इतर लाभार्थी यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुर घरकुलाचा दुसरा हप्ता टाकण्यासाठी यातील पंचायत समिती घनसावंगी येथील राणीउचेगाव सर्कलचे कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता विशाल लक्ष्मणराव कनुजे (वय-३८ वर्ष) यांनी चाळीस रुपये लाचेची मागणी करुन तीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना गंगाधरवाडी, हरे कृष्ण नगर, ता. जि. जालना येथे रंगेहात पकडले.