
गेवराई - ही बॅग उचलवत नाही अन् ओझं ही पेलवत नाही ना ग--!आई मला, हे बोल ग्रामीण भागातील गावखेड्यातील शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या तोंडातून ऐकण्यात येत आहेत. शिक्षणास असलेली बॅग अक्षरशः ओझ्याची प्रतीक बनल्याने शालेय बाल विद्यार्थी यांच्या आरोग्यास धोकादायक बनत चालली असून, पालकांच्या चिंतेत वाढ करणारी आहे.