खळबळजनक : मोदींची सेफ रूम होती सुपारीबहाद्दराच्या जागेत!

योगेश बरीदे
रविवार, 8 डिसेंबर 2019

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी उभारली जाणारी सेफ रूम आपण गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या संशयित सुपारीबहाद्दर माणसाच्या जागेत उभारत आहोत, याची पोलिसांना पूर्वकल्पना नव्हती का?

परतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये निवडणूक प्रचारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेफ रूम उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जालना शहरातील व्यापारी विमलराज सिंघवी व बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परतूर येथील व्यापारी राजेश नहार याला अटक केली आहे. सध्या गौतम मुनोत सुपारी प्रकरणी राजेश नहार हा पोलिस कोठडीत आहे. परतूर रेल्वेस्टेशन परिसरातील महावीर पेट्रोल पंपावर 2007 मध्ये मोठी दुर्घटना झाली होती. यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळीही राजेश नहार याला चौकशीला सामोरे जावे लागले होते. 

इथे होता - सेक्ससाठी तीन हजार रेट

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी 16 ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परतूर येथे आले होते. ही सभा राजेश नहारच्या जिनिंगपासून हाकेच्या अंतरावर होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये पंतप्रधानांसाठी सेफ रूम तयार केली होती. अर्थात, नरेंद्र मोदी या सेफ रुमकडे गेले नसले, तरी आता राजेश नहार याचे कारनामे उघड झाल्यामुळे ही सेफ रूम प्रकरण चर्चिले जाऊ लागले आहे. 

क्लिक करा - जालन्याचे हे बिल्डर होते राजेश नहारचे टार्गेट

पोलिसांना माहिती नव्हते का? 

पोलिसांनी प्रोटोकॉलच्या अनुषंगाने बनवलेल्या इथल्या सेफ रूममध्ये पंतप्रधान मोदी आलेच नाहीत, हा भाग वेगळा. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी उभारली जाणारी सेफ रूम आपण गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या संशयित सुपारीबहाद्दर माणसाच्या जागेत उभारत आहोत, याची पोलिसांना पूर्वकल्पना नव्हती का? पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेफ रूम तयार करताना जागामालकाच्या पार्श्‍वभूमीची तपासणी केली नव्हती का, अशा प्रश्‍नांना आता उधाण आले आहे. 

कोण आहे हा राजेश नहार? 

कौटुंबिक पार्श्‍वभूमी सामान्य असलेल्या व्यावसायिक राजेश नहार याची आर्थिक परिस्थिती 2006 पर्यंत फारशी ठीक नव्हती. आर्थिक अडचणीमुळे काही काळ त्याला परतूर सोडावे लागले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील काही राजकीय लोकांचा सहारा घेत नहार याने रिअल इस्टेटच्या व्यवसायाला सुरवात केली. 2017 मध्ये परतूर शहरात अक्षय कॉटेज नावाने जिनिंग सुरू करत त्याने व्यवसायात झेप घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्‍टोबरला परतूर येथे सभेसाठी आले होते. ज्या ठिकाणी त्यांची सभा होती, त्या ठिकाणाच्या जवळ त्यांची सेफ रूम करणे गरजेचे होते. यामुळे राजेश नहार याची जिनिंग आणि परिसर पोलिस प्रशासनाने तीन दिवस पूर्णपणे ताब्यात घेतला होता. या सर्व गोष्टींची माहिती वरिष्ठांना होती. 
- शिरीष हुंबे, पोलिस निरीक्षक, परतूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safe Room for Prime Minister was Made in Rajesh Nahar's Cottage