सेक्‍ससाठी तीन हजारांचा रेट; या शहरातील मॉल व्यवस्थापकासह एजंट, वारांगना अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

 औरंगाबाद शहरात कुंटणखान्यांचा कुटील उद्योग तेजीत असून दोन ठिकाणी छापे घालून गुन्हे शाखा पोलिसांनी कुंटणखाना चालक महिला पुरुष व चार ग्राहकांना अटक केली. अटक केलेल्यात एका बड्या मॉलचा व्यवस्थापकाचा समावेश आहे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुंटणखान्यांचा कुटील उद्योग तेजीत असून दोन ठिकाणी छापे घालून गुन्हे शाखा पोलिसांनी कुंटणखाना चालक महिला पुरुष व चार ग्राहकांना अटक केली. अटक केलेल्यात एका बड्या मॉलचा व्यवस्थापकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच कुंटणखान्यावर यापूर्वी पुंडलिकनगर ठाणे पोलसांनी कारवाई केली होती. 
-- 
शहरातील बीडबायपास भागातील राजेशनगर येथे बिनभोटपणे कुंटणखाना सुरु होता. या कुंटणखान्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. 8) बनावट ग्राहक पाठविला. त्याने कुंटणखाना चालक महिलेला रेट विचारला. त्या महिलेने तीन हजार रुपये रेट सांगितला. मग काय पोलिसांचे कामच झाले खबर पक्की होताच बनावट ग्राहकाने इशारा केला आणि छापा घालण्यात आला.

हेही वाचा - व्हॉट्सअप स्टेटस पाहणे विनयभंग

मॉलचा व्यवस्थापकाचा समावेश

पोलिसांनी तेथून कुंटणखाना चालक महिला व संजय त्र्यंबक कापसे (वय 44, रा. गणेशनगर ) तसेच ग्राहक अजय सुभाष साळवे (वय 23, रा. भारतनगर ), ज्ञानेश्वर सर्जेराव जऱ्हाड (वय 42, रा. बदनापूर, जि. जालना ), महंमद अर्शद साजिद अली (वय 29, रा. चिखलठाणा), अमोल दामू शेजूळ (वय 29, रा. मुकुंदवाडी ) अशी संशयित ग्राहकांची नावे आहेत. यातील अर्शद हा एका मॉलचा व्यवस्थापक आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : ऐकावे ते नवलच, औरंगाबादेत चक्‍क भिंतच हरवली 

मद्यसाठ्यासह 1लाख 44 हजारांचा ऐवज जप्त

हे सर्व ग्राहक कुंटणखान्यात वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या काही महिलांसोबत आढळून आले. या सर्वाना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून तीन महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तसेच मद्यसाठ्यासह 1लाख 44 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

हेही वाचा ः ज्येष्ठांनो सावधान...

दोन हजार रुपये प्रती ग्राहक

दुसरी कारवाई यशवंतनगर बीडबायपास भागात पोलिसांनी केली. येथेही अशाच पद्धतीने छापा घालण्यात आला. या कुंटणखान्यात सेक्‍ससाठी दोन हजार रुपये प्रती ग्राहक आकारले जात होते. येथून एक महिला तसेच एजंट विनोद टेकचंद नागवणे यांना अटक करण्यात आली. तेथून पोलिसांनी 29 हजार 775 रुपयांचा ऐवज जप्त केला. येथे देहविक्री करणाऱ्या महिलेची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sex Racket Agent Arrested in Aurangabad