Bhum News : सई खामकर हिचे 'रंगोत्सव सेलिब्रेशन' राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
'रंगोत्सव सेलिब्रेशन' ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली एक प्रतिष्ठित कला स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेक राज्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
भूम - पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सई खामकर हिने राष्ट्रीय पातळीवरील 'रंगोत्सव सेलिब्रेशन' कला स्पर्धेत सुवर्णपदक आणि पारितोषिक मिळवून शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.