esakal | सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द
sakal

बोलून बातमी शोधा

Main

‘कोट्यवधीची यंत्रसामुग्री धुळखात’ या मथळ्याखाली बुधवारी (ता.१३) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच परभणी महापालिकेने शुक्रवारी जेसीबीची दोन यंत्रे कंत्राटदाराकडे सुपूर्द केली. या वेळी रविंद्र सोनकांबळे, गुलमीरखान, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते. सदरिल जेसीबी कंत्राटदाराच्या ताब्यात राहणार असून पालिकेला ती वापरासाठी दररोज साडेपाच तास मिळणार आहेत. 

सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी ः ‘कोट्यवधीची यंत्रसामुग्री धुळखात’ या मथळ्याखाली बुधवारी (ता.१३) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशासकीय पातळीवर हालचाली गतीमान झाल्या व शुक्रवारी (ता.१५) महापालिकेने दोन जेसीबी यंत्रे कंत्राटदाराकडे सुपूर्द केली. सदरील यंत्रे पालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी दररोज साडेपाच वापरता येणार आहेत.

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून दोन-तीन महिण्यांपुर्वी दोन जेसीबी यंत्रे खरेदी केली होती.तर ही यंत्रे वापरासाठी एखाद्या एजन्सी अथवा कंत्राटदाराला देण्याचा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदार देखील निश्चित झाला होता. परंतु, ही यंत्रे देण्यातही नव्हती आली व त्यामाध्यमातून कामेदेखील केल्या जात नव्हती. ती पालिकेच्या परिसरात धुळखात पडली होती. 

हेही वाचा - सहा हजारांवर शेतकऱ्यांचा एक लाख क्विंटल कापूस खरेदी

यंत्रांचे केले पूजन
शुक्रवारी (ता.१५) ही यंत्रे संबंधित कंत्राटदाराकडे महापालिका परिसरात सुपूर्द करण्यात आली. तत्पुर्वी स्थायी समितीचे सभापती गुलमीरखान, माजी नगरसेवक रविंद्र सोनकांबळे, नगरसेवक महेमुदखान, अभय देशमुख, यांत्रिकी विभागप्रमुख मिर्झा तनवीर बेग, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी या यंत्रांचे श्रीफळ फोडून पूजन केले.

हेही वाचा - हिंगोलीत विभागीय पथकाने घेतला उपाययोजनांचा आढावा

महापालिकेला मिळणार दररोज साडेपाच तास
ही यंत्रे कंत्राटदार सुदाम माने यांना नियमाप्रमाणे देण्याचा निर्णय झाला आहे. ही यंत्रे सदरील कंत्राटदाराच्या ताब्यात राहणार असून चालक, डिझेलसह देखभाल दुरुस्तीचा खर्च सदरील कंत्राटदारांकडे राहणार आहे. दररोज साडेपाच तासाचे किंवा महिण्याला १६० तास ही दोन्ही यंत्रे पालिकेच्या कामासाठी वापरता येणार आहेत. उर्वरित वेळेत कंत्राटदार ती स्वतःच्या कामासाठी वापरू शकतात, अशी माहिती यांत्रिकी विभागप्रमुख श्री.बेग यांनी दिली. 

महापालिकेतील सातशेवर कर्मचाऱ्यांना होमिओपॅथिक औषधांची मात्रा
महापालिकेतील सातशेवर कर्मचारी व स्वच्छता कामगारांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या ‘आर्सेनिकम अल्बम’ या होमिओपॅथिक औषधांची मात्रा देण्यात आली. राजगोपालाचारी उद्यानात शुक्रवारी (ता. १५) सकाळी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्था व इंडियन होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रतिनिधीक स्वरूपात सफाई कामगारांना या वेळी या मात्रेचे वितरण करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव यांच्यासह एचआरसीचे डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, चंद्रकांत अमीलकंठवार, गोपाल मुरक्या, राजेश्वर वासलवार, करण गायकवाड, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती. या वेळी डॉ. पवन व डॉ. आशा चांडक यांनी कोरोना तसेच फ्लूसारख्या संर्सगजन्य आजारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या औषधींचे फायदे, पथ्य व मात्रा, औषधी कसे घ्यायचे या विषयी प्रात्यक्षिकद्वारे उपस्थित कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.

loading image