सहा हजारांवर शेतकऱ्यांचा एक लाख क्विंटल कापूस खरेदी

kapus
kapus

परभणी ः जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्यांपैकी सहा हजार ५३३ शेतकऱ्यांचा एक लाख ३४ हजार ६९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. अजुनही ४० हजार २४३ शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी शिल्लक आहे.

लॉकडाउनमुळे कापूस खरेदी बंद झाल्यानंतर मागील महिण्यात शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन कापूस खरेदीला परवानगी दिली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास सांगितल्याने (ता.१८ ते २७) एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. (ता.२८) पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. शासकीय हमीभाव पाच हजार ५५० रुपये असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर विक्रीला पसंती दिली आहे. 

एक लाख ३४ हजार क्विंटल कापसाची खरेदी 
नोंदणीपासून ते ता.१४ मे पर्यंत जिल्ह्यात सहा हजार ५३३ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे. एक लाख ३४ हजार ६९९.० क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. अजुनही ४० हजार २४३ शेतकऱ्यांचा आठ लाख ६५ हजार ३००.७० क्विंटल कापूस खरेदी शिल्लक राहिला आहे. खरेदीसाठी पणन महासंघ (फेडरेनशन) ची परभणी, पाथरी, करम (ता.सोनपेठ), गंगाखेड या ठिकाणी आणि भारतीय कापूस निगम (सिसीआय) यांची जिंतुर, सेलु, मानवत, पूर्णा, ताडकळस या ठिकाणी केंद्र आहेत.

पाऊस तोंडावर, खरेदी मोठी
पाऊस तोंडावर आलेला आहे, खरिपाची पेरणीची तयारी देखील सुरु झाली असून अजुनही १५ ते २० दिवस मान्सुनचा पाऊस धडकण्याची शक्यता आहे. सध्या दररोज ढगाळ वातावरण तयार होत आहे. अधुन-मधुन पाऊस देखील येत असल्याने शिल्लक असलेल्या कापसामुळे शेतकरी चिंतेत आहे. खरेदी केंद्रावर ग्रेडरची संख्या कमी असणे, करार केलेल्या जिनींगकडून कापुस खरेदी केली जात नसल्याने खरेदीचा वेग कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वेग आणखी वाढवावा लागणार आहे.

एकुण खरेदी २२ लाख क्विंटलवर
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत पणन महासंघाकडून सात खरेदी केंद्रावर पाच लाख ३१ हजार ५५१.३५ क्विंटल, भारतीय कापुस निगम (सिसीआय) कडून १० लाख ६६ हजार २६ क्विंटल, खाजगी व्यापाऱ्यांनी सहा लाख ९६ हजार ३४५ क्विंटल अशी एकुण २२ लाख ९३ हजार ९२२.३५ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com