‘सकाळ’च्या ट्विटची रेल्वे मंत्रालयाकडून दखल

भागवत पेटकर
बुधवार, 10 मे 2017

नांदेड: नांदेड-तिरुपती सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीसमोर मंगळवारी (ता. 9) रात्री सव्वाआठच्या दरम्यान शिवणगाव स्टेशनजवळ एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल आडवी टाकल्याने गाडीच्या इंजिनाला अडकली होती. त्यामुळे हा अपघात होऊन इंजिनसह गाडीचे दोन डब्बे रूळावरून घसरले होते. या बाबत सर्वप्रथम नांदेड ‘सकाळ’च्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन रेल्वे मंत्रालयाला ट्वीट्स करून या घटनेची माहिती दिली.

रेल्वे मंत्रालयाने नांदेड ‘सकाळ’च्या अधिकृत ट्विटर अकाउंटला प्रतिसाद देत या अपघाताची माहिती दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड (डीआरएम) आणि हैदराबाद यांना ट्विटरवरुन कळविण्यात आली. त्यानंतर दक्षिण-मध्य रेल्वेने तात्काळ यंत्रणा हलवत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरु झाल्याचे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक डॉ. एम. के. सिन्हा यांनी नांदेड ‘सकाळ’च्या ट्विट खात्यावर ट्विट करुन सांगितले.

या अपघाताने रेल्वेच्या रूळाचे जवळपास चाळीस मिटर नुकसान झाले आहे. तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांना रात्री साडेअकराच्या सुमारास नांदेडवरून एक इंजिन मागवून नांदेडला पाठवण्यात आले. याच सुमारास मेदचल-नांदेड गाडी शिवणगावला थांबली होती. ती गाडी परत हैदराबादला वळविली आणि या गाडीत सिंकदराबाद, हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना रवाना केले.

Web Title: Sakal tweet is interfered by Railway Ministry