Gangapur News : अपंगत्वावर मात करत शिक्षणाची जिद्द; चालता येत नाही तरी स्वप्नंना पंख, मायलेकींच्या संघर्षाला मदतीची प्रतीक्षा

बालपणापासून शारीरिक अपंगत्वाशी झुंज देणाऱ्या साक्षीला स्वतःच्या पायावर चालता येत नाही. साधे बसण्यासाठीही तिला दुसऱ्याच्या आधाराची गरज भासते. मात्र....
Sakshi Alhat

Sakshi Alhat

sakal

Updated on: 

लिंबेजलगाव - गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील राजे शहाजी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय साक्षी गौतम आल्हाट हिची शिक्षणासाठीची धडपड मन हेलावून टाकणारी आहे.

नांदेडा (ता. गंगापूर) येथे बालपणापासून शारीरिक अपंगत्वाशी झुंज देणाऱ्या साक्षीला स्वतःच्या पायावर चालता येत नाही. साधे बसण्यासाठीही तिला दुसऱ्याच्या आधाराची गरज भासते. मात्र, शारीरिक मर्यादांपुढे हार न मानता उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून ती शिक्षणाची वाट चालत आहे. या प्रवासात तिचा सर्वात मोठा आधार आहे तिची आई संगीता आल्हाट.

sakshi home

sakshi home

sakal

Loading content, please wait...