Dispute Over Tur Daal Theft Turns Violent
अनिल गाभुड
विहामांडवा : सालवडगाव (ता. पैठण) शिवारात सुरू असलेल्या तुरी चोरीच्या घटनांमुळे एक गंभीर वाद उफाळून आला असून एका तरुण शेतकऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शेतात संशयित दिसताच वाद वाढला फिर्यादी सिद्धेश्वर भीमराव तहकीक (वय २५) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या गट क्रमांक ३५ या शेतातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून तुरी चोरीला जात असल्याची शंका होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी साधारण ६ वाजता ते पाहणीसाठी शेतात गेले असता त्यांना संदिप चव्हाण हा व्यक्ती शेतात फिरताना संशयास्पद स्थितीत दिसला.