समगा, खरबी गावांची निवड, का ते वाचा...

karjamukti yojana.jpg
karjamukti yojana.jpg

हिंगोली ः जिल्‍ह्यात महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची अमंलबजावणी सुरू झाली असून कर्जखात्याशी आधार जोडणी झाली आहे. हिंगोली तालुक्‍यातील समगा व खरबी गावातील २३३ शेतकरी लाभार्थींची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या बाबत या दोन्ही गावांत जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार, तहसीलदार मधुकर खंडागळे, सहायक निंबधक जितेंद्र भालेराव यांनी या गावात भेट देऊन आधार प्रामाणीकरणाच्या कामकाजाची पाहणी केली. यासाठी तहसील व उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.

९६ हजार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलद्वारे अपलोड
जिल्‍ह्यात महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेत आतापर्यंत एक लाख पाच हजार ६९० शेतकऱ्यांच्या कर्जखात्याशी आधार जोडणी झाली असून त्‍यापैकी ९६ हजार ९९५ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलद्वारे अपलोड करण्यात आली आहे. अद्यापही ३५०० शेतकऱ्यांनी विनाविलंब त्‍यांचे ओळखपत्र संबंधित बँक शाखेत देऊन आधार जोडणीचे कामकाज पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन योजनेसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्‍हास्‍तरीय समितीने केले आहे.

आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू
या योजनेच्या अमंलबजावणी अंतर्गत पायलट प्रामाणीकरणासाठी हिंगोली तालुक्‍यात येणाऱ्या समगा व खरबी या दोन गावांची निवड करण्यात आली. समगा येथून १४७ व खरबी येथून ८६, असे एकूण २३३ शेतकरी लाभार्थींची यादी संबंधित गावात सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्‍यानंतर या लाभार्थींचे आधार प्रामाणीकरणाचे काम सुरळीतपणे सुरू झाले आहे. समगा येथील व खांबाळा येथील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत बायोमॅट्रिक पत्राद्वारे हे आधार प्रमाणीकरणाचे काम करण्यात येत आहे.

समगा व खरबी येथील लाभार्थी
समगा व खरबी या दोन गावांतील बँकनिहाय लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात समगा येथील अलाहाबाद बँकेत एक लाभार्थी, बँक ऑफ इंडिया २८ लाभार्थी, स्‍टेट बँक ऑफ इंडिया २२ लाभार्थी, युनियन बँक ऑफ इंडिया ९६, असे एकूण १४७ लाभार्थी, तर खरबी येथे बँक ऑफ बडोदाचे ८६ लाभार्थी, असे एकूण १३३ लाभार्थींचा यात समावेश असल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांनी दिली. दरम्यान, जिल्हा प्रशासन सध्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वस्तरावर पुढाकार घेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com