Sambhaji Nagar : बांधा.. वापरा... हस्तांतरित करा नव्हे, तर भूखंड दुसऱ्याच्या घशात घाला!

विकसकाची मुदत संपली; आता तारीख पे तारीख’
बीओटी
बीओटीsakal

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी महापालिकेच्या मानगुटीवर बसविलेले ‘बीओटी’चे (बांधा वापरा व हस्तांतरित करा) भूत १७ वर्षानंतरही कायम आहे. महापालिकेला मोठे उत्पन्न मिळणार, अशी स्वप्ने दाखवून कोट्यवधी रुपयांचे भूखंड विकसकांच्या घशात घालण्यात आले, पण यातील बहुतांश प्रकल्प ‘फेल’ झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी नुकसानच जास्त झाले आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्ता यांनी शहरात बीओटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनेक मोक्याच्या जागा विकसित करण्यासाठी प्रशासनाने विकसकांच्या ताब्यात दिल्या. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यातील प्रकल्प पूर्ण झालेले नसताना प्रशासनातर्फे नव्याने बीओटीचे धोरण सुरूच ठेवले.

विकसकांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार कामांची मुदत संपलेली असताना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. त्यानंतर अनेक प्रकल्पाचे अद्याप सांगाडेच उभे आहेत. रेल्वे स्टेशन रोडवरील व्यापारी संकुल, शहानूरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियन, पडेगाव येथील कत्तलखाना, सिद्धार्थ उद्यान असे काही बोटावर मोजण्याएवढेच प्रकल्प पूर्ण झाले, तर उर्वरित प्रकल्प अधांतरीच आहेत. दरम्यान काही प्रकल्प महापालिकेनेच बंद केले. यात तब्बल साडे पाच कोटी रुपये परत देवून श्रीहरी पव्हेलियनची जागा महापालिकेने परत घेतली.

बीओटी
Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

लिलाव पद्धतीने कोट्यवधीचा फायदा

महापालिकेच्या अनेक जागा अद्याप पडून आहेत. ‘बीओटी’ धोरणावर वारंवार विरोध झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी टीव्ही सेंटर येथे महापालिकेतर्फे व्यापारी संकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला. येथील गाळे लिलाव पद्धतीने महापालिकेने विक्री केले. त्यातून तब्बल १२ ते १३ कोटी रुपये महापालिकेला फायदा झाला. याच धर्तीवर आता नेहरू भवनच्या जागेवर व्यापारी संकुल उभारले जात आहे. त्यामुळे ‘बीओटी’चे अर्धवट पडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन कंत्राटदारासोबतचा करार रद्द करून जागा महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.

बीओटी
Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

अशी आहे प्रकल्पांची अवस्था

  • सिद्धार्थ गार्डन : विकसकांच्या वादात ८० गाळ्यांची विक्री थांबली.

  • शहानूरवाडी श्रीहरी पॅव्हेलियन : साडेपाच कोटी देऊन महापालिकेने जागा परत घेतली.

  • ज्योतीनगर जलतरण तलाव : विकसकासोबतच्या वादामुळे करार रद्द. प्रकल्प कुलुपबंद

  • रेल्वेस्टेशन व्यापारी संकुल : काम पूर्ण

  • कॅनॉट प्लेस परिसरातील स्पोर्टस कॉम्लेक्स : काम पूर्ण

  • वसंत भुवन शॉपिंग मॉल : संथगतीने दहा वर्षांपासून काम सुरु, रोहित्राची अडचण.

  • पडेगाव येथील कत्तलखाना : पहिला टप्पा पूर्ण, दुसऱ्या टप्याची प्रतीक्षा.

  • वेदांत नगर जलतरण तलाव : काम अंतिम टप्यात.

  • औरंगपुरा भाजीमंडई : प्रकल्प रखडला.

  • शहागंज भाजीमंडई : प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com