मराठवाडा पदवीधर निवडणूक : भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती

हरि तुगावकर
Sunday, 8 November 2020

मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लातूर : मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदी माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहिर झाली आहे. ता. एक डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात मतदान होणार आहे.

कितीही सांगा! प्रलंबित कोरोना चाचण्यांचा प्रश्‍न कायम, आरोग्यमंत्री टोपेंच्या जालना जिल्ह्यातील चित्र

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राहणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचे नेतृत्व करणारे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांच्या खांद्यावर आता या निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्री. निलंगेकर यांना निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त कराल असा विश्वासही श्री.पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Patil Nilangekar Elected As BJP's Election Chief