कितीही सांगा! प्रलंबित कोरोना चाचण्यांचा प्रश्‍न कायम, आरोग्यमंत्री टोपेंच्या जालना जिल्ह्यातील चित्र

20navi_20mumbai_6_1
20navi_20mumbai_6_1

जालना : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक वेळा दिल्यानंतरही प्रलंबित चाचण्यांचा प्रश्‍न कायम असल्याचे चित्र आहे. रविवारी (ता.आठ) दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून कळविण्यात आलेल्या अहवालानुसार तब्बल एक हजार ३१९ कोरोना चाचण्या प्रलंबित होत्या. त्यामुळे आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्र्यांचे ही ऐकण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान रविवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नवीन ७६ कोरोना रुग्णांची भर पडली. तर ५१ जण कोरोनामुक्त झाले.


जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व कोरोना संशयितांच्या चाचणी अहवाल तत्काळ उपलब्ध व्हावा. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करून सुरू केली. त्यानंतर श्री.टोपे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सतत सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासन व आरोग्य यंत्रणेची पाच तास बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी कोरोना चाचण्या वाढविण्यावर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले. मात्र, तरी देखील आरोग्य यंत्रणाचा घाणा आहे तासाच सुरू आहेत.

रविवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्साकांकडून आलेल्या कोरोना अहवालानुसार तब्बल एक हजार ३१९ कोरोना चाचण्या प्रलंबित असल्याचे नमूद आहे. त्यामुळे प्रलंबित अहवालांचा हा प्रश्‍न कधी संपणार असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान जिल्ह्यात रविवारी दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २९९ कोरोनाग्रस्त रूग्णांचा बळी गेला आहे. तर दुसरीकडे नव्याने ७६ जणांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे.

यामध्ये जालना शहरातील २५, तालुक्यातील काकडा, वडगाव, साडेगाव येथील प्रत्येकी एक, मंठा तालुक्यातील खोराड सावंगी येथील दहा, घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी, रामगव्हाण व मंगरुळ येथील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव येथील १६, सुतगिरणी येथील चार, दहयाळा येथील तीन, कोठाळा, अंबड शहर व जामखेड येथील प्रत्येकी एक, बदनापुर तालुक्यातील वाकुळणी येथील दोन, तालुक्यातील बाजार वाहेगाव, खादगाव व बदनापूर शहरातील एक व इतर जिल्ह्यातील चार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अकरा हजार ३२७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ५१ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत दहा हजार ४७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५४९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com