
Latest Crime news: काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारा गावठी कट्टा व 5 जिवंत काडतूसासह एका 24 वर्षीय आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडून जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी (ता.27) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर हे यांना सोमवारी (ता.27) रोजी गुप्तबातमीदार मार्फत माहीती मिळाली की, नायरा पेट्रोलपंप वडगाव (को.) येथे एक इसम देशी बनावटीचा कट्टा (अग्निशस्त्र) विक्री करण्यासाठी येणार आहे.