प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संभाजीनगरमध्ये राडा! ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते का आले आमनेसामने? जोरदार घोषणाबाजी..

Thackeray group in Sambhajinagar: दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
chandrakant khaire bhumare
chandrakant khaire bhumare

छ. संभाजीनगर- संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं देखील पाहायला मिळालं. या सर्व प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांकडून दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांना एकाच वेळी रॅलीची परवानगी देण्यात आली होती. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते क्रांती चौकात आमनेसामने आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांकडून जोरजार घोषणाबाजी सुरु झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याची देखील माहिती आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

chandrakant khaire bhumare
Dhule Lok Sabha Election : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर; धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दानवे आणि कार्यकर्त्यांनी दारुच्या रिकाम्या बाटल्या रॅलीमध्ये आणल्या होत्या. यावेळी विरोधी गटाकडे पाहून घोषणाबाजी झाली. दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली. दानवे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना कोणी धक्का लावला तर आम्ही सोडणार नाही. त्याचे हात तोडण्यात येतील. आम्ही शांत बसणार नाही.

उशिराने शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे हे रॅलीमध्ये सहभागी झाले. त्यांनी म्हटलं की रॅलीमध्ये धक्काबुक्की झालेली नाही. त्यांनी ज्या दारुच्या रिकाम्या बाटल्या आणल्या आहेत, त्या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांचे दोनशे देखील कार्यकर्ते जमा झालेले नाहीत. आमचे हजारो कार्यकर्ते याठिकाणी आले आहेत. ते कितीही हिणवू द्या. ४ जूनला त्यांना दाखवून देऊ.

chandrakant khaire bhumare
Beed Lok Sabha Election: बीड लोकसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; कोण जाणार दिल्लीत?

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे लोकसभेच्या मैदानात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होईल असं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com