खासदार संभाजीराजे प्रकरण : सकल मराठातर्फे उद्या तुळजापूर बंदची हाक | Tuljapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SambhajiRaje

खासदार संभाजीराजे प्रकरण : सकल मराठातर्फे उद्या तुळजापूर बंदची हाक

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात (Tuljabhawani Temple) खासदार संभाजीराजेंना (Sambhajiraje ) अडवल्याचे प्रकरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर आता सकल मराठा समाजातर्फे उद्या तुळजापूर बंदची हाक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (Sakal Maratha Community Call Tuljapur Band )

हेही वाचा: ओबीसी आरक्षण: CM ठाकरेंची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

संभाजीराजेंना गाभाऱ्यात अडवल्यानंतर राज्यभारातील कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हाधिकारी, मंदिर तसहसीलदार, व्यवस्थापक यांच्यावर आता कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिर आणि संभाजीराजेंच्या घराण्याचे विशेष नाते राहिले आहे. मात्र, पुरातत्व विभागाच्या एका निर्णयामुळे छत्रपती संभाजीराजेंना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर अनेक स्तरातून या घटनेचा निशेध व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा: दोन रुपयांत मिळणार एक लिटर शुद्ध पाणी, IIT कानपूरने बनवले उपकरण

मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्यामुळे संभाजीराजेंचा अपमान झाल्याचा दावा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला असून, त्यांच्याकडून मंदिर व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्यानंतर तात्काळ संभाजीराजे छत्रपती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्यांना खडे बोल सुनावले.

संभाजीराजे भोसले मंगळवारी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पुरातत्व विभागाने जारी केलेला नियम सांगत प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर मंदिर प्रशासनाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत एक पत्रकही जारी केले. मात्र, त्यानंतरही हा वाद काही शांत होताना दिसत नसून, आज सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या पार पडलेल्या बैठकीत उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.

Web Title: Sambhajiraje Chhatrapati Stopped In Tuljabhavani Temple Sakal Maratha Community Call Tuljapur Bandh Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top