Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातातील जखमींना तातडीने मदत; राजेश टोपे यांनी दिला मदतीचा हात

राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे नागपूरहून जालन्याकडे समृद्धी महामार्गाने प्रवास करत असताना मेहकर-देवळगाव राजाच्या महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली.
Former Health Minister Rajesh Tope assisting accident victims on the Samruddhi Expressway

Former Health Minister Rajesh Tope assisting accident victims on the Samruddhi Expressway

sakal

Updated on: 

अंबड - राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे नागपूरहून जालन्याकडे समृद्धी महामार्गाने प्रवास करत असताना मेहकर-देवळगाव राजाच्या महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघाताची दुर्दैवी घटना घडली. अपघातामुळे अनेक वाहने रस्त्यावर थांबलेली असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने सुमारे १५ ते २० वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले.

Loading content, please wait...