

IT Engineer Couple and Infant Son Killed in Tragic Samruddhi Expressway Accident
Sakal
माळीवाडा, (ता. छत्रपती संभाजीनगर) : लहान भावाच्या लग्नाचे नियोजन सुरू असल्याने पुण्यावरून गावी जालन्याकडे निघालेल्या कुटुंबावर शनिवारी (ता. २६) समृद्धी महामार्गावर काळाने घाला घातला. नागपूर कॉरिडॉरवरील वेरूळ परिसरात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कारने समोर चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पुण्यातील तरुण आयटी अभियंता पती, त्यांची पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला.