Samruddhi Sugar Factory: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! समृद्धी कारखाना देणार प्रतिटन ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान

Sugarcane Farmers Get Relief From Samruddhi Factory: समृद्धी कारखान्याचे दोन्ही युनिट १५ ऑक्टोबरपासून सुरू; १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
Samruddhi Sugar Factory Announces 300 Rupees Per Tonne Incentive for Sugarcane Farmers and Plans 12 Lakh Tonne Crushing

Samruddhi Sugar Factory Announces 300 Rupees Per Tonne Incentive for Sugarcane Farmers and Plans 12 Lakh Tonne Crushing

esakal

Updated on: 

घनसावंगी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा समृद्धी कारखाना युनिट नंबर २ सह आगामी गाळप हंगामासाठी सज्ज झाला असून १५ ऑक्टोबर २०२६ पासून समृद्धी युनिट १ आणि २ चे गाळप सुरू होणार आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन कारखान्याने ७५० ते ८०० टोळ्यांची यंत्रणा उभी केली असून १०० ते १२० दिवसांत कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच कारखाना प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठरणाऱ्या दराव्यतिरिक्त प्रति टनामागे ३०० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com