घनसावंगी - शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून मराठवाड्यात ओळख निर्माण केलेल्या समृद्धी साखर कारखान्याने यंदाही उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवली आहे. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मेट्रिक टन प्रमाणे दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी सोमवारी (ता. २६) केली. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठी मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.