esakal | श्रृतीच्या मदतीला सांची आली धावून : कशी ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

nanded photo

डी. के. पाटील विद्यालयात शिक्षण घेत असलेली आठ वर्षाच्या सांची तरटेचा रविवारी (ता.१६) जन्मदिवस होता. परंतु तीने आणि तिचे वडील राम तरटे यांनी हा वाढदिवस साजरा न करता श्रृतीचे वडील गंगाधर रोडगे यांची भेट घेवून आर्थिक मदत दिली.

 

श्रृतीच्या मदतीला सांची आली धावून : कशी ते वाचाच

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : बच्चे कंपनीच्या आठवणीतला दिवस म्हणजे जन्मदिवस. वाढदिवस कळायला लागल्यापासूनच मुले-मुली वाढदिवसाला पालकाकडून हवा तो हट्ट पुरवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न कतात. मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून आपला वाढदिवस अतिशय अगळ्या वेगळ्या प्रकारे कसा साजरा व्हावा यासाठी पालकांकडे सतत पाठपुरावा करत असतात. पण नांदेडच्या एका आठ वर्षाच्या चिमुकलीने सलग दोन वर्षांपासून पालकाकडे वाढदिवसाचा हट्ट न धरता इतरांच्या मतदिला धावून जाण्याचा उपक्रम सुरुच ठेवला आहे.

रविवारी (ता.१६) तीने वाढदिवस न करता विजेचा धक्का लागुन दोन्ही हात गमावलेल्या श्रृतीला रुग्णालयात जाऊन मदत दिली. कुटुंबाला आहे मदतीची गरज तरोडा भागात राहणारे गंगाधर रोडगे यांची श्रृती (चारवर्ष) नावाची मुलगी घराच्या छतावर खेळत असताना तिचा विजेच्या तारांशी संपर्क आला. तिला जोराचा विजेचा धक्का लागल्याने तिला दोन्ही हात गमवावे लागले आहेत. सध्या श्रृती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. घरची हल्लाखिची परिस्थिती असल्याने तिच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबाकडे पुरेसे पैसे देखील नाहीत. त्यामुळे तिच्या उपचारासाठी कुटुंबाला मदतीची खरी गरज आहे.

अशी आहे श्रृतीच्या घरची स्थिती

गंगाधर रोडगे हे तरोडा भागातील एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. दोन मुली, एक मुलगा व पत्नीसह भाड्याच्या खोलीत राहतात. श्रुती घराच्या छतावर खेळण्यासाठी गेली असता या चिमुकलीला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तिचे प्राण वाचले असले तरी, तिला दोन्ही हात गमवावे लागले. तिच्यावर सध्या नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरची आर्थिक स्थिती नाजुक असल्याने तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचा बातम्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत आहे.

हेही वाचानांदेड महापालिकेपुढे करवसुलीचा डोंगर

‘सांचि’ने जोपासले सामजिक दायित्व

राम तरटे यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी होणारा खर्च कमी करून ही रक्कम श्रुतीच्या उपचारासाठी मदत म्हणून रविवारी श्रृतीच्या कुटुंबियांची शासकीय रुग्णालयात जाऊन राम तरटे, संघरत्न पवार, कमल फाऊंडेशनचे अमर गोधने यांनी भेट घेतली. जखमी बालिकेची भेट घेऊन ही मदत दिली. गतवर्षी पुलवामात शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठीही वाढदिवसाच्या निमित्ततिने सांची तरटे या बलिकेने असाच निधी दिला होता. या वेळी सांचीने आपल्या वाढदिवसाचा होणारी खर्च टाळुन जखमी मुलीचे आई-वडील यांना वाढदिवसाची ही रक्कम जखमी श्रुतीच्या मदतीला देऊन सांचीने पुन्हा एकदा सामाजिक दायित्व जोपासले आहे.

हेही वाचलेच पाहिजे- महाराष्‍ट्रातील तीस नागरिकांचा दुबईत कसा झाला सन्मान...

‘सकाळ’च्या बातमीचा असाही परीणाम

सध्या विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या श्रृतीला सांचीने मदत केल्याची बातमी सोमवारी (ता.१७) सकाळमधुन प्रकाशीत झाली. ती बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अमेरीकेतील ‘सकाळ’चे भारतीय वाचक महेंद्र मोहरील यांनी बातमी वाचली. त्यांनी लगेच श्रृतीच्या वडीलांशी संपर्क साधुन त्यांच्या बॅंक खात्यात १५ हजाराची रक्कम जमा केली.