भोकरदन - तालुक्यातील लिंगेवाडी शिवारात अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या भरारी पथकावर वाळू माफियांनी अक्षरशः हल्ला चढवत नायब तहसिलदारांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली..पथकाने पकडलेला नंबरविरहित हायवा जबरदस्तीने पळवून नेण्यात आला. या धक्कादायक घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतरच गुन्हा नोंद करण्याची नौटंकी पार पडली असून, या संपूर्ण प्रकारावर प्रकरण दाबण्याचा संशय अधिक गडद झाला आहे..जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेल्या कठोर आदेशांनुसार उपविभागीय अधिकारी बी. सरवनन व तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गौणखनिज पथक कार्यरत आहे. तरीही लिंगेवाडीत सुरू असलेल्या अवैध उत्खननावर लगाम लावण्यासाठी नायब तहसिलदार नवनाथ घोरपडे यांच्या यांचे पथक 3 डिसेंबर रोजी पहाटे छापा टाकण्यासाठी गेले..तेथे नंबर नसलेला हायवा पकडताच अचानक योगेश लोखंडे (रा. लिंगेवाडी) व त्याच्या दोन साथीदारांनी पथकाच्या गाडीला अडवून भीषण हल्ला केला. नायब तहसिलदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ आणि सरळ जिवे मारण्याच्या धमक्या देत पकडलेला हायवा पळवून नेण्यात आला. जीव वाचवण्यासाठी पथकाने घटनास्थळावरून पळ काढावा लागला..गाडीच्या काचा फोडल्या, पण माहिती दडपली?पथकाने वरिष्ठांना माहिती दिली, मात्र सरकारी गाडीचे नुकसान आणि काचा फोडल्याचा मुद्दा मात्र लपवण्यात आल्याची चर्चा तालुक्यात जोरात. एवढेच नव्हे, तर हे नुकसान उलट हायवा चालकाकडून भरून घेतल्याचेही बोलले जात आहे!यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे..दहा दिवसांनी गुन्हा - कोणाला संरक्षण?घटनेस दिवस उलटून गेल्यानंतरही कारवाईचा मागमूस नव्हता. यामुळे वाळू माफियांचे वरदहस्त आणि प्रशासनातील काहींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली. अखेर शुक्रवारी (ता. १२) रात्री नायब तहसिलदार घोरपडे यांच्या तक्रारीवरून योगेश लोखंडेसह तिघांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पणअद्याप एकाही आरोपीला अटक नाही!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.