

Two Cousins Killed in Speeding Sand Transport Highway Crash Near Mangrul Phata One Person Seriously Injured
esakal
-बाळासाहेब काळे
करमाड: सुखना नदीतून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. करमाड-पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ रविवारी (ता. २२) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक पुनमचंद बिमरोट (वय २६) आणि अर्जुन काळुसिंग बिमरोट (वय २०, दोघे रा. नागुनीची वाडी) अशी मृतांची नावे असून, प्रकाश कांतिलाल बिमरोट (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. तिघेही चुलत भाऊ असल्याने या घटनेने नागुनीची वाडी गावावर शोककळा पसरली आहे.