Yoga Day Fitness Ride: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माजी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची ५० किमी सायकल सफर

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची ५० किमी सायकल सफर; फिटनेस, योग व सायकलिंगद्वारे निरोगी जीवनशैलीचा संदेश
Leadership Legacy: Bridging the Gap Between Authority and Community

Leadership Legacy: Bridging the Gap Between Authority and Community

Sakal

Updated on

शेंदूरवादा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निरोगी जीवनशैलीचा संदेश देत वाळूज पोलीस ठाण्याचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी रविवारी(ता.21)पहाटे छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर महामार्गवर गंगापूर तालुक्यातील जिकठाण फाटा येथील सृष्टी पर्यटन केंद्रापर्यंत तब्बल ५० किलोमीटर सायकलिंग करून फिटनेसचा आदर्श घालून दिला. अनेक वर्षांनंतर आज छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर रोडवर त्यांची सायकल पुन्हा धावताना दिसल्याने नागरिकांमध्येही उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com