Sanjay Shirsat : आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? हॉटेल लिलाव प्रक्रिया कायदेशीर पार पडली: संजय शिरसाट
Political Controversy : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल लिलाव प्रक्रियेतील आरोप फेटाळले. लिलाव न्यायालयाच्या आदेशाने झाला असून सर्व काही कायदेशीररित्या पार पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर: ‘आमच्या मुलांनी व्यवसाय करायचा नाही का? आमची मुलं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. हॉटेल माझ्या मुलाने विकत घेतली असे सांगितले गेले. मात्र माझा मुलगा एकटा नसून त्यात पाच पार्टनर आहेत.