

Emergency Action: Local Swimmers and Fire Brigade Mobilize Under PSI Vaibhav Sarang
Sakal
पैठण : जायकवाडी धरण परिसर पाहण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील दोन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी(ता. ३१)घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून एका युवकाचा मृतदेह शोध पथकाला मिळाले आहे, तर रात्रीचा अंधार सुरु झाल्याने दुसऱ्या युवकाचा शोध तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी सोमवारी ( ता.१)सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. असे पोलिसांनी सांगितले.