
भूम : संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भूम तालुक्यातील दांडेगाव गावात आगमन झाले. गावकऱ्यांनी या सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे रस्त्याच्या दुतर्फी सडा, रांगोळी काढण्यात आली होती.