
परंडा : टाळ-मृदंगांचा गजर, हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीसाठी निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रविवारी (ता. २९) सायंकाळी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथ चौकात आगमन झाले. मोठ्या भक्तिभावाने, जल्लोषात पालखीचे स्वागत झाले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.