Ashadi Wari 2025: संतांच्या भेटीने तेरमध्ये भाविक झाले धन्य! गजानन महाराजांची पालखी गोरोबाकाकांच्या मंदिरात
Sant Gajanan Maharaj : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व श्री संत गोरोबाकाकांच्या पालखी सोहळ्यांची तेर येथील भेट भाविकांसाठी पवित्र ठरली. गर्दीला विचारता, भक्तिमय वातावरणात रांगोळ्या आणि मोफत सेवांची व्यवस्था केली गेली होती.
तेर (ता. धाराशिव) : तेर येथे तेरणा नदीतीरावर शेगाव येथील श्री संत गजानन महाराज व श्री संत गोरोबाकाकांच्या पालखी सोहळ्यांची बुधवारी (ता. २५) भेट झाली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.