Sant Gajanan Maharaj Palkhi : शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी परळीत दाखल झाली असून शहरात भक्तिमय स्वागत झाले. श्रींची पालखी औष्णिक केंद्रात मुक्कामी आहे.
परळी वैजनाथ : शेगाव (जि. बुलडाणा) येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १९) दुपारी जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाले असता, परळीकरांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.