Ashadhi Wari 2025 : संत जनाबाईंच्या पालखीचे प्रस्थान; गंगाखेडला विठ्ठलनामाचा गजर, दिंडीत अनेक वारकऱ्यांचा समावेश
Sant Janabai Palakhi : गंगाखेड येथून संत जनाबाई पालखी सोहळ्याला भाविकांच्या जयघोषात प्रारंभ झाला. ११ दिवसांचा प्रवास करत पालखी ३ जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे.
गंगाखेड : संत जनाबाई यांच्या पालखीचे जन्मस्थान असलेल्या गंगाखेडमधून सोमवारी (ता. २३) पंढरीकडे प्रस्थान झाले. यावेळी वारकरी व भाविकांनी विठूराया व संत जनाबाईंच्या नामाचा गजर केला.