Ashadhi Wari 2025 : बीड शहर भक्तिरसात न्हाले! संत मुक्ताईंच्या पालखीची सवाद्य भव्य मिरवणूक
Sant Muktabai Palkhi : संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थानाने बीड शहर भक्तिरसात न्हालं असून बालाजी मंदिरात पालखीचा भावपूर्ण मुक्काम झाला. आजोबा श्रीधरपंत कुलकर्णी यांच्या समाधीजवळ नात मुक्ताईची ‘भावनिक भेट’ होणार आहे.
बीड : श्री क्षेत्र मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत मुक्ताईंच्या पालखीचे आज हनुमान मंदिरातून बालाजी मंदिरात प्रस्थान झाले. यानिमित्त टाळ-मृदंगाचा गजर, बॅंडच्या ठेक्यावर शहातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.