
हिंगोली : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथे बुधवारपासून (ता. २६) तीनदिवसीय यात्रेला सुरवात होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधी दर्शनासाठी दाखल होतील. परिसरातील साठ गावांतील दिंड्याही दाखल होणार आहेत. नामाच्या गजराने हे गाव तीन दिवस भक्तिरसात दंग होईल.