
परळी वैजनाथ : नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथून पंढरपूरला निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी (ता. २५) शहरात भक्तिमय वातावरणात स्वागत झाले. वैद्यनाथाच्या या पावनभूमीत रिंगण सोहळा रंगला. मोठ्या प्रमाणावर वारकरी, भाविक उपस्थित होते.