

Only three saint palanquin chariots in Maharashtra receive this traditional ‘Joo’ offering, making the ceremony spiritually significant.
Sakal
कायगाव : महाराष्ट्रात केवळ तीन संतांच्या पालखी रथांना ‘जू’ अर्पण करण्याचा मान आहे. सद्गुरु संत शेख महंमद महाराज पालखी सोहळा हा त्यातील तिसरा संत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील बाबासाहेब डुबे, प्रसाद नवथर, पंडित चव्हाण, विश्वास महाडिक आणि विवेक महाडिक यांनी सलग तिसऱ्या वर्षी पालखी रथाच्या बैलांसाठी पारंपरिक ‘जू’ अर्पण करून ही भक्तीपरंपरा जपली.