Santosh Danvesakal
मराठवाडा
Santosh Danve : संतोष दानवे करणार राज्यातील युवकांना सक्षम; दानवे बनले टीम देवेंद्र फडणवीस चा भाग
Devendra Fadnavis : भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची राज्याच्या युवा धोरण समितीवर निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या राजकीय सक्षमता व फडणवीस यांच्याशी असलेल्या विश्वासाचे प्रतिक मानली जात आहे.
भोकरदन : भोकरदन चे आमदार संतोष दानवे यांची नुकतीच राज्याच्या युवा धोरण समितीवर निवड करण्यात आली आहे. 19 व्या वर्षी मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये भोकरदन जाफराबाद तालुक्यांमध्ये संघटनेच्या माध्यमातून युवकांचे जाळे विणणाऱ्या 2014 ला विधानसभेतील सर्वात तरुण आमदार म्हणून ओळख असणाऱ्या व सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या संतोष दानवे यांच्या पंधरा वर्षाच्या विधिमंडळ प्रवासाला देवेंद्र फडणवीस यांनी या समिती मध्ये महत्त्वाचे स्थान युवा धोरण व राजकीय प्रगल्भता सिद्ध केल्याची दिसते.