

sudarshan ghule
esakal
Beed Court: संतोष देशमुख खून प्रकरणात आरोपींवर चार्ज फ्रेम होण्याची वेळ आलेली आहे. शुक्रवारी (दि. १९) कोर्टात सुनावणी सुरु असताना सुदर्शन घुले या आरोपीला चक्कर आली. त्यामुळे कोर्टाचा वेळ गेला. मागच्या सुनावणीवेळी आरोपी प्रतीक घुले याला अशीच चक्कर आलेली होती. चार्ज फ्रेम करु नये, वेळ द्यावा अशी मागणी सातत्याने आरोपींचे वकील करीत आहेत. यापूर्वी अनेकदा असाच वेळकाढूपणा आरोपींकडून झालेला आहे. खुद्द उज्वल निकम यांनीही ही बाब वारंवार कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेली होती.