
केज, ता.१३ (बातमीदार): जलसंधारणाच्या कामाची दखल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय कार्यक्रमासाठी मस्साजोग या गावाची निवड केली आहे. मस्साजोग येथील सरपंच श्रीमती वर्षा सोनवणे यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथील कार्यक्रमास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल बुधवारी (ता.१३) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.